कोलेस्टेरॉल एवढंच घातक असतं शरीरातलं , त्या साठी काय करावे . कसे नियंत्रित ठेवावे . जाणून घ्या.

 कोलेस्टेरॉल एवढंच घातक असतं शरीरातलं ट्रायग्लिसराईड वाढणं

कोलेस्टेरॉल म्हणजे काय?  

*कोलेस्टेरॉल* हा शरीरात नैसर्गिकरित्या आढळणारा मेदयुक्त पदार्थ आहे, जो पेशींच्या संरचनेसाठी आणि संप्रेरक (हॉर्मोन्स) तयार करण्यासाठी महत्त्वाचा असतो. परंतु जास्त प्रमाणात कोलेस्टेरॉल शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो.

कोलेस्टेरॉलचे प्रकार*  
1️⃣ *एचडीएल (HDL - High-Density Lipoprotein)* – "चांगले कोलेस्टेरॉल," जे हृदयासाठी फायदेशीर असते.  
2️⃣ *एलडीएल (LDL - Low-Density Lipoprotein)* – "वाईट कोलेस्टेरॉल," जे हृदयविकाराचा धोका वाढवते.  
3️⃣ *व्हीएलडीएल (VLDL - Very Low-Density Lipoprotein)* – हे देखील हानिकारक असून चरबी साठण्यास कारणीभूत ठरते. 

त्या साठी काय करावे . कसे नियंत्रित ठेवावे . जाणून घ्या.


1️⃣ कोलेस्टेरॉलबाबत आता बऱ्याच प्रमाणात लोक जागरुक झालेले आहेत. पण त्याच्या एवढंच घातक ठरू शकणारं ट्रायग्लिसराईडही नियंत्रित असायला हवं यासाठी खूपच कमी लोक प्रयत्न करताना दिसतात.(how to control triglyceride level?)

2️⃣ शरीरातलं ट्रायग्लिसराईड वाढलं तर रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढत जातो (4 causes of high triglycerides). म्हणूनच डॉ. सलीम जैदी यांनी याविषयी माहिती देणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली असून यांनी ट्रायग्लिसराईड नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावे, याविषयीची माहिती दिली आहे.(best way to control triglyceride level)

3️⃣ डॉक्टर सांगतात की तुमच्या आहारात साखरेचं प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला मधुमेह होण्याप्रमाणेच शरीरातील ट्रायग्लिसराईड वाढण्याचा धोकाही असतो. त्यामुळे गोड पदार्थ, कोल्ड्रिंग, पॅकेज फूड यांपासून शक्य तितकं लांब राहा.

4️⃣ तळलेले पदार्थ तसेच जंक फूड खाण्याचं प्रमाण कमी करा. कारण त्यामुळेही शरीरातले ट्रायग्लिसराईड वाढू शकते.

5️⃣ जा लोकांना अल्कोहोल जास्त प्रमाणात घेण्याची सवय असते त्या लोकांच्या लिव्हरवर परिणाम होतो आणि लिव्हर खराब झाल्यामुळे त्यांच्या शरीरातले ट्रायग्लिसराईड वाढू शकते.

6️⃣ ज्या लोकांच्या शारीरिक हालचाली खूपच कमी असतात त्या लोकांनाही ट्रायग्लिसराईड वाढण्याचा धोका असतो.

7️⃣ ट्रायग्लिसराईड नियंत्रित ठेवण्यासाठी नियमितपणे फळं, भाज्या, ओट्स, अक्रोड यासारखे पदार्थ खावेत. तसेच दररोज ३० मिनिटे तरी कोणता ना कोणता व्यायाम करावा.

उच्च कोलेस्टेरॉलमुळे होणारे धोके* ❌ हृदयविकाराचा झटका (Heart Attack) ❌ उच्च रक्तदाब (High Blood Pressure) ❌ अर्धांगवायू (Stroke) ❌ लठ्ठपणा (Obesity) *कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपाय* ✔ आहारात ताज्या फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा. ✔ तळलेले आणि गोड पदार्थ टाळा. ✔ नियमित व्यायाम करा. ✔ धूम्रपान व अल्कोहोल टाळा. ✔ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या.

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सअन्नहृदयविकाराचा झटकाहृदयरोग

Post a Comment

0 Comments